दिनांक:- १३/०४/२०२६
स्थळ:- सामाजिक न्याय भवन , हिंगोली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट शासनाकडून सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन दिनांक ०८ ते १४ ह्या कालावधीत करण्यात आले आहे, त्यानिमित्त आज दि. १३ रोजी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , या कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमा पूजनाने झाली ह्यावेळी मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट देण्यात आली , कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण च्या सहाय्य्क आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे यांनी तर प्रमुख व्याखाते म्हणून प्रा. गजानन बांगर ह्यांनी मार्गदेशन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोबरे , उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे , समाजभूषण पुरस्कार्थी मधुकर मांजरमकर , आनंद शिखरे , डॉ.विजय निलावार, रवींद्र पत्की , सिद्धार्थ गोवंदे आदी सह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते...







टिप्पणी पोस्ट करा