छ. शिवराय स्वराज्य संस्थापक...

छ.शिवाजी महाराज 
इ.स १९फेबुवारी १६३० ते ०३एप्रिल १६८०
पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर 1630 साली जिजा मातेच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. बालपणी त्यांच्या मनावर जिजाबाईंनी चांगले संस्कार केले होते. रामायण महाभारतातील कथा सांगून त्यांच्या बालमनात विर आणी महान बनण्याची इच्छा जिजाबाईंनी निर्माण केली होती.हुशार, स्वामिनिष्ठ करारी व अनुभवी अश्या दादोजी कोंडदेवांकडून राजांनी लष्करी शिक्षणाबरोबरच राज्यकारभाराचे शिक्षण घेतले अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या बाल शिवाजिंनी हर हर महादेव च्या गजरात रायरेश्वराच्या मंदिरामध्ये इ. सन 1645 स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि मोघलशाही,निजामशाही व आदिलशाही ला सुरुंग लावला.
आपल्या लहान वयातच त्यांनी तोरणा किल्ला सर केला.स्वराज्यस्थापनेचे हे पहिले पाऊल होते.त्यांनी गावात राहणाऱ्या मावळ्यांची सेना तयार केली.आणि त्या सेनेला घेऊन विजापूरचा किल्ला जिंकला.
स्वराज्यस्थापनेचे कार्य :-
सत्ता, संपत्ती,सैन्य,व किल्ले या चार आधार स्तंभावर स्वराज्य  मंदिर उभारण्याचा राज्यांनी अतोनात प्रयत्न केला व तो सिद्धीस नेला तोरणा,राजगड, कोंडाना आणी चाकण हे किल्ले घेताच आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले पण त्यावेळी शिवाजी महाराजांनी दाखवलेले कौशल्य,धडाडी,युद्धनीती ही कोणत्याही धुरंदर नेत्याला साजेशी अशीच होती.अफजलखाना सारख्या शक्तिशाली सेनापतीच्या पोटात वाघनखे खुपसली मोठ्या चातुर्याने त्यांनी त्याचा वध केला.
      विजापूरचे दुसरे सरदार सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता, त्यातून महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली. पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची नाचक्की केली. शिवाजी महाराजांना आपल्या काबूत आणण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखान दिलेरखानाला पाठवले होते, पण त्या दोघांना महाराजांनी हरवले शेवटी राजा जयसिंग ला पाठवले गेले.त्यांच्या सांगण्यावरून महाराज आग्र्याला गेले.तिथे त्यांना कैदेत टाकले गेले तेथून कौशल्यपूर्वक स्वतःची सुटका करून घेतली, ती आग्र्याहून सुटका होय. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने या घटना त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरतात.
      शिवाजी महाराजांनी स्वतःला 1674 साली राज्याभिषेक करून घेतला. मरगळलेल्या मराठी जनतेच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी आपल्या रक्तामांसाचा  राजा आपल्यावर राज्य करतो आहे, असे तिला वाटले पाहिजे,जनता सुखी राहावी, या सर्व हेतूने त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्यावर बसल्यावर त्यांनी रायगड ही आपली राजधानी केली.
       राज्यभिषेक झाल्यावर शिवाजी महाराजांनी राज्यात सुधारणा सुरू केल्या .करवसुली, शांतीस्थापना,सेनेचे संघटन, शेती,इत्यादी क्षेत्रात सुधारणा केल्या.स्थळ सेनेबरोबरच आरमारी संघटन केले व ती साधनसामग्री वाढवली. त्या काळात मराठी भाषेची प्रगती झाली होती.
       शिवाजी महाराज मोठे शूर वीर व साहसी होते.तीव्र बुद्धीमता,संघटन कौशल्य, हिंदवी स्वराज्या चे संस्थापक, संस्कृतीचे रक्षणकर्ते असे थोर सेनानी म्हणून त्यांना किर्ती लाभली.वेळ आणी माणसे ओळखण्याची अदभुत क्षमता व पारख त्यांच्याजवळ होती. ते सर्व धर्म, धर्मग्रंथ,आणी धर्मस्थानांचा सन्मान करीत. उत्तम चारित्र्य,मुत्सद्देगिरी, राजकारणाची जाण, राष्ट्रकल्याण करणारा राजा, शत्रुंचा कर्दनकाळ,अलोकिक अदभुत पराक्रम,प्रजेबद्दल वात्सल्य या गुंणांमुळे ते लोकप्रिय झाले.सर्व भारतीयांच्या अंत:करणात त्यांना आजही मानाचे स्थान आहे, हे गुण त्यांच्या ठिकानी असल्यामुळे आपण त्यांना आदर्श राजा व प्रशासक मानतो.
       शिवप्रभूंचा अवतार म्हणजे साक्षात शिवाचा अवतार! अशा लोकोत्तर महापुरुषाचे गुण आणि कार्य सर्वच भारतीयांना प्रेरणा देत राहील.
      आपल्या जीवनात अनेक वर्षे लढण्यात गेल्यामुळे आणि कठोर परिश्रमामुळेच शेवटी महाराज थकले आणि इ.स 1680 मध्ये त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
________________________________________

0/Post a Comment/Comments