प्रेमाला उजाळा देणारा दिवस...Valentine Day Special.

                                           प्रेमाला उजाळा देणारा दिवस 
        प्रेम हा अडीच अक्षरांचा शब्द ऐकला तर हर्ष होतो, उच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो. प्रेम म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या शब्दात करणं सोपं नाही, प्रेमासाठी 14 फेब्रुवारी हा एकच दिवस का असावा? हे मला कळत नाही. कारण वर्षाचे 365 दिवस आपण एकमेकांवर प्रेम करीत असतो, त्याकरिता एक दिवस असावा असं मला वाटत नाही प्रत्येक दिवस प्रेमाचा असतो असं मला वाटतं, प्रेम आंतरिक भावना आहे. ते कधी, कुणावर केव्हा कसं होईल हे सांगता येत नाही. भारतात पाश्चात्य संस्कृती आली पण आम्हाला ती अजूनही पचनी पडली  नाही त्याचाच एक भाग ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ ला आमच्या देशात राजकीय विरोध होतो. आमच्या संस्कृती च्या नावाखाली कधी तो योग्यही वाटतो. कारण 'व्हॅलेंटाईन डे' ला
आम्ही बागेत भेटतो मनमोकळ्या गप्पा मारताना नको ते कृत्य आमच्याकडून घडत.याला प्रेम म्हणायच का? हा प्रश्न आम्हाला पडतो. याला प्रेम नाही तर शारिरीक भुक म्हणावी लागेल. यातूनच लाखो तरुण तरुणी बरबाद होताना दिसतात. विशेषत विद्यार्थी दशेतील प्रेम म्हणजे एक पवित्र बंधन आहे. 
                                    “प्रेम म्हणजे काय असत,
            दुधावरची साय असत आपुलकीची ऊब मिळताच चटकन उतु जात असत.”
प्रेम आम्ही व्यक्त कराव ते आमच्या बद्दल  समोरच्यालाही असाव, निव्वळ एकतर्फी असु  नये. प्रेमाच प्रतिक लाल गुलाब म्हणजे प्रेमाची विशालता, मधुरता, शालीनता, महानता, 'व्हॅलेंटाईन डे' ला कुणाचाही विरोध नसावा या दिवसाला आमच्या कडून गालबोट लागता कामा नये, 
                                     प्रा.गजानन बांगर ,हिंगोली 
                                       मो 9767095181 
Published by 14 Feb 2014 Deshonnati Hingoli News paper

0/Post a Comment/Comments